Learn Sewing in 9 Indian Languages

शिवणकाम हे एक उत्तम कौशल्य आहे. त्यामुळे आपण क्रीएटीव्ह होऊ शकता आणि आणि बऱ्याच मार्गांनी स्वत: चे विचार मांडू शकता. आता हे एक असे कौशल्य आहे जे आपणास योग्य प्रकारे शिकण्याची गरज आहे. तेव्हाच आपण वेगाने प्रगती करू शकाल आणि आपले स्वतःचे डिझाइन तयार करू शकाल.

Ushasew.com ही अद्भुत हस्तकला जाणून घेण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. येथे असे धडे डिझाइन करण्यात आले आहेत, जे आपणास प्रत्येक चरणाची योग्य पद्धतीने माहिती देतील. आपण मूलभूत तत्वे शिकाल आणि आपल्यासाठी एक ठोस आधाराची निर्मिती केली जाई, जी आपल्या उर्वरित आयुष्यासाठी आपल्याला मदत करेल. जेव्हा आपण आपल्या कौशल्यांना उजाळा देता, तेव्हा आपण रूचीपूर्ण प्रकल्प तयार करुन त्यांचा चांगल्या प्रकारे वापर करता. हे प्रकल्प व्हिडिओ, आपण अलीकडेच आत्मसात कौशल्यांचा वापर करण्यासाठी, धड्यांच्यामध्ये महत्वपूर्णपद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत.

आपल्या मातृभाषेत पाठ आणि प्रकल्प

शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि चांगली करण्यासाठी आम्ही देशाच्या सर्वाधिक भागास व्यापणाऱ्या ९ भारतीय भाषांमध्ये पाठ आणि प्रकल्प उपलब्ध असल्याचे सुनिश्चित केले आहे.  इंग्रजी आणि हिंदी भाषांशिवाय आपणास गुजराती, कन्नड, तमिळ, बंगाली, मल्याळम, तेलगु आणि मराठी भाषा देखील उपलब्ध आहेत.

अनुसरण करण्यास सोप्या निर्देशांसह तपशीलवार धडे

सर्व पाठांवर तपशीलवार विचार केला गेला आहे आणि आपल्याला ठोस आधार देण्यासाठी त्यांची योजना करण्यात आली आहे. आपण ज्या सूचना ऐकता त्या आपल्याला प्रत्येक चरणाचा तपशील सांगतात आणि आपणास कलेमध्ये निपुण बनविण्यासाठी आपला हात धरून आपणास रस्त्याने पुढे मार्गदर्शन करतात.

आमच्याकडे काही असे उत्कृष्ट लोक आहेत जे शिलाईकामास चांगल्या प्रकारे समजतात आणि अशा तुकड्यांपासून काहीतरी नवीन निर्माण करतात ज्यांना अन्यथा फेकून दिले गेले असते. भाषा सोपी आहे आणि गती ही मुद्दामहून सहज आहे जेणेकरुन आपण सर्वकाही सत्मासात करू शकता.

क्लिक करा आणि आपली भाषा निवडा.

उषासो डॉट कॉम साइटवर आपल्याला आपली भाषा निवडणे खरोखरच सुलभ वाटेल. सुरुअवतीसच जेव्हा आपण धड्यांच्या आणि प्रकल्पांच्या पृष्ठांमध्ये प्रवेश करता, तेव्हा आपल्याला उपलब्ध असलेल्या ९ पैकी कोणतीही भाषा निवडण्याची विनंती केली जाईल. एकदा आपण एखाद्या भाषेची निवड केली की सर्व व्हिडिओ त्या भाषेत प्ले होतील. सर्वोत्तम भाग म्हणजे जेव्हा आपण इच्छिता तेव्हा आपण भाषांच्या दरम्यान टॉगल करू शकता.

या पाठांचा योग्य क्रमाने अभ्यास करा.

आता हा लेख आपल्याला सूचित करतो की, आपणास जी भाषा सर्वात सोयीस्कर आहे त्या भाषेत आपण शिकू शकता. आम्ही या गोष्टीवर भर देतो की आपण योग्य क्रमाने पाठांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उषासो डॉट कॉमवरील सर्व सामग्री, आपल्याला शिवणकामाच्या कलेमध्ये एक ठोस आधार देण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. जर आपल्यासाठी ही हस्तकला नवीन असेल, तर आपणास योग्य क्रमाने गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आणि जर आपल्याकडे आधीपासून काही ज्ञान असेल, तर आपण आपल्या कौशल्यांना धार देऊ शकता.

जर आपल्याकडे एखादी अन्य भाषा असेल जिच्यामध्ये आपण, आमच्याकडून पाठ व प्रकल्प भाषांतरित करू घेऊ इच्छित असला, तर कृपया आम्हाला कळवा. आणि आम्ही बघू ते कसे करायचे. शिवाय जर आपण एखादा प्रकल्प तयार केला असेल, तर कृपया त्यास आमच्याशी शेअर करा. आपण आमच्या सोशल नेटवर्क लिंक खाली शोधू शकता.

जर आपणास मदत किंवा अधिक माहिती हवी असेल, तर आम्हाला आमच्या हेल्पलाइनवर कॉल करा.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment