Sewing a bookmark is easy and fun

वेबसाईट www.ushasew.com ने एक सर्वसमावेशक शिक्षण कार्यक्रम तयार केला आहे, जो आपणास शिवणकामाच्या सर्व चरणांची माहिती देईल. व्हिडिओ अनुसरण करण्यासाठी सोपे आहेत, त्यात तपशीलवार सूचना आहेत आणि ते ९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. हे पाठ सुरवातीपासूनच प्रारंभ करतात आणि आपणास एका वेळी एक चरण पुढे घेऊन जातात. सर्व धड्यांच्या शेवटी आणि सरावाने आपण शिलाईकाम करू शकाल आणि अविश्वसनीय गोष्टी करण्यासाठी आपली निर्मितीक्षमता वापरू शकाल.

पण फक्त काम करत राहिल्याने आणि कोणताही खेळ न खेळण्याने लहान मुळे सुस्त बनतात. म्हणूनच www.ushasew.com ने लहान, सोप्या प्रकल्पांसह विखुरलेले पाठ तयार केले आहेत. या प्रकल्पांमुळे आपण शिकलेल्या सर्व कौशल्यांचा वापर करू शकता आणि कापडांवर इतर सामग्रीवर देखील प्रयोग करून बघू शकता.

आता पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे बुकमार्क बनविणे.

हा पहिला प्रकल्प का आहे याचे कारण हे आहे की, कारण यामध्ये आपण पहिल्या काही दोन पाठांमध्ये जे शिकलात त्याचा वापर केला गेला आहे. आपण प्रथम उषा शिलाई  मशीनचे कसे सेट अप कशा प्रकारे करावे ते शिकून घ्यावे, मग कागदावर शिवणकाम करताना आपल्या स्टिचेसला कशा प्रकारे नियंत्रित करावे ते शिकावे आणि शेवटी कापडवर शिवण्यास सुरुवात करावी. याच कौशल्यांचा वापर, बुकमार्क प्रकल्पांमध्ये केला जातो. आपण सरळ रेषेत आणि कोपऱ्यांच्या आजूबाजूने शिवू शकता. बस इतकेच. हे साधे आणि सोपे वाटते आणि ते आहेच.

बुकमार्क प्रकल्पामुळे, आपण आपले स्वत: चे कापड आणि रंग निवडू शकतो. आपला बुकमार्क अद्वितीय बनवण्यासाठी, सजावट आणि इतर आकर्षणे कशी जोडावीत हे देखील आपणास दाखविते.

आपल्याला फक्त चरण-दर-चरण सूचनांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि शिलाईकामात प्रवीण व्हाल. आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रकल्प व्हिडिओला काही वेळा पाहावे अशी आम्ही शिफारस करतो. जेव्हा आपण पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहाल, तेव्हा आपल्याला आवश्यक असलेली सर्व सामग्री एकत्र गोळा करा. त्यानंतर व्हिडिओला विराम देऊन आणि दर्शविल्याप्रमाणे सामग्रीला घडी करण्याचा प्रयत्न करून किंवा तिला हाताळणी करण्याचा प्रयत्न करून प्रत्येक चरण, समजून घ्या. जेव्हा फक्त आपली खात्री होईल आणि आपणास आत्मविश्वास वाटेल, तेव्हाच आपण वास्तविक शिलाईकाम सुरु करावे.

आता प्रामाणिकपणे, हे खरोखरच सोपे आहे. हे केवळ सरळ रेषा आणि चार कोपरे आहेत. बस इतकेच. परंतु त्यात आपल्याला क्रीएटीव्ह होण्यासाठी भरपूर जागा आहे. आपण खरोखर येथे प्रयोग करू शकता. मिरर, बीड्सचे तुकडे वापरा, कापड मिक्स करा आणि जुळवा आणि आपली कल्पनाशक्ति जे सांगते ते करा. अशा प्रकारे आपण बनविलेले प्रत्येक बुकमार्क अद्वितीय असेल.

बुकमार्क्स छान भेटवस्तू असतात.

होय! ही एक भेट असते, जी एखाद्या व्यक्तीस आपली आठवण करून देत राहते. प्रत्येक वेळी जेव्हा ते वाचत असलेल्या पुस्तकाकडे परत येतील आणि त्यांचे पृष्ठ शोधण्यासाठी बुकमार्कचा वापर करतील, तेव्हा ते शांतपणे आपले आभार मानतील.

तसेच आपण ज्या व्यक्तीस हे बुकमार्क देत आहात तिच्याशी जुळण्यासाठी आपण बुकमार्कला वैयक्तिकृत करू शकता. जर ते फूटबॉलम खेळत असतील, तर ब्लॅक अँड व्हाइट षटकोन जोडा, एखादी दोरीवरील छोटी घंट्या झोपण्याच्या वेळेच्या पुस्तकांना अधिक माजोरांजक बनवितात… आम्ही आता पुढे सांगणार नाहीत आणि आपल्या क्रीएटीव्हीटीला काम करून देऊ.

आपणास शिलाईकाम कसे करावे हे जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास कृपया Ushasew.com वर लॉग इन करा. येथे आमच्याकडे असे पाठ आणि प्रकल्प आहेत जे आपणास शिलाईकामामध्ये एक मजबूत आधार देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपणास असे पाठ आणि प्रकल्प सापडतील आपांस कौशल्य शिकवतील आणि नंतर त्यांचा कशा प्रकारे वापर करावा ते दाखवतील. आणि हे सर्व काही माहितीपूर्ण मार्गाने. आणि ९ भारतीय भाषांमध्ये.

जेव्हा आपण प्रकल्प तयार करण्यास सुरुवात कराल, तेव्हा आपली निर्मिती, कोणत्याही सोशल नेटवर्कवरील आमच्या पृष्ठांवर शेअर करा. आपल्यासाठी खालील लिंक्स दिलेल्या आहेत.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment