Make Your Phone Happy With A Mobile Pouch

आज आपला फोन आमच्याजवळ असलेल्या सर्वात मौल्यवान उपकरणांपैकी एक आहे. यात सर्वकाही आहे, संपर्कांपासून ईमेल ते शॉपिंग ऍप्सपासून फोटोजपर्यंत. आमच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्सचा हा लहान भाग एक अपरिवार्य बनला आहे म्हणूनच आपण त्यास सुरक्षित ठेवणे आणि आपल्या शैलीला त्यास प्रतिबिंबित करायला लावणे हे महत्वाचे आहे. आपल्याला दिवसभरात घडून आलेल्या त्याच्या आदळआपटपासून त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आम्ही याची देखील खात्री करणे आवश्यक आहे की आपण त्यास चुकीच्या ठिकाणी ठेवले जाऊ नये.

हे करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे एखादी पाउच शोधणे आणि त्यात आपला फोन घेऊन जाणे. बाजारातून खरेदी केलेल्या पाउचविषयी एकमात्र समस्या अशी असते की टी कधीही अद्वितीय आणि एकमेव नसते.

एक अशी मोबाइल पाउच जी खरोखर आपल्या व्यक्तिमत्त्वास आणि शैलीस प्रतिबिंबित करते, खरोखर आपल्या स्वतः ला बनवावी लागेल. जर आपण विचार करत असाल की हे कसे होईल, तर काळजी करू नका, आम्ही आपल्याला दाखवू.

आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकत्र करून सुरुवात करा.

आपण सुरवात करण्यापूर्वी आपल्याला मोबाइल फोन कव्हर बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकत्रित करणे आवश्यक आहे. “ए हँडी मोबाईल पाउच” नावाच्या आमच्या प्रकल्प व्हिडिओमध्ये हे तपशीलवार सूचीबद्ध केलेले असताना, आम्ही हे बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी तयार केली आहे.

कापडचा एक तुकडा, जो ९ इंच गुणिले १३ इंचांपर्यंत आहे.

कापडाचे तीन तुकडे जे आपल्या सेलफोनपेक्षा कमीत कमी ३ इंच मोठे आहेत. यापैकी एक रंगीत, मुद्रित किंवा टेक्सचर्ड कापड असू शकते.

सजावटीसाठी एक बटण

फास्टनर म्हणून वेल्क्रोचा एक इंचाचा तुकडा.

आणि स्लिंगसाठी एक लांब रिबन.

एकदा आपण हे सर्व एकत्र केल्यावर आपण आपला फोन किंवा आपला लॅपटॉप जवळ घेवून आपल्या शिलाई मशीनच्या शिलाई टेबलावर आरामशीरपणे बसावे.

धडा पहा आणि शिका

वेबसाइट www.ushasew.com ला भेट द्या आणि प्रकल्प नं. ३ वर क्लिक करा. या पाठामध्ये आम्ही आपणास मोबाइल पाउच कशी बनवावी ते दाखवितो. येथे आम्ही आपल्यासाठी सुरूवातीलाच प्रारंभ करतो आणि आपल्याला प्रत्येक चरणामधून घेऊन जातो आणि काय करावे आणि कसे करावे ते स्पष्ट करतो.

जेव्हा आपण प्रकल्पाचा व्हिडिओ पहाल. तेव्हा आपल्याला दिसेल की आम्ही प्रथम चरणापासून प्रारंभ करतो. त्यात आवश्यक असलेली सर्व सामग्रीची आणि इतर वस्तूंची मांडणी करणे समाविष्ट आहे. मग आम्ही काय करावे आणि कसे करावे हे स्पष्ट करतो. आपल्यास आवश्यक असलेली स्टिचची लांबी, वेल्क्रोला जोडणे आणि अखेरीस आपल्या पाउचला फिनिश करणे या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत जेणेकरून ती पाउच आकर्षक दिसून येईल.

आता आम्ही, आम्हाला आवडणारे रंग आणि वस्त्रे वापरली आहेत. आपल्या आवडीनुसार आपणास काहीही निवडण्याची मुभा आहे. तर मग सुरुवात करा आणि साहसीपूर्ण काम करा. आपल्या मनाप्रमाणे शिलाई करा आणि टेक्स्चरला आजमावा. ही आपली मोबाइल पाउच आहे त्यामुळे तिच्याद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि शैलीला प्रतिबिंबित केले गेले पाहिजे. फक्त अचूक मापे घ्या (दोनदा मोजण्याचे आणि नंतर एकदा कापण्याचे लक्षात ठेवा). आपल्याकडे व्हिडिओमध्ये वापरल्या जात असलेल्या फोन पेक्षा मोठा फोन असेल, तर पाउचमध्ये आपला फोन व्यवस्थित बसण्यासाठी केवळ मोजमापे वाढवा. येथे देखील वास्तविक आकारापेक्षा थोडे अधिक माप घेणे चांगले आहे, जेणेकरुन आपण नंतर अतिरिक्त सामग्री कापून टाकू शकता.

जर हा आपला पहिलाप्रकल्प असेल, तर आम्ही आपणास हळूहळू काम करण्याची शिफारस करतो. आपण एक स्टिच देखील टाकण्यापूर्वी व्हिडिओ पुन्हा पहा. आपण काय करत आहात याची खात्री करा. ही वेगाने शिलाईकाम करण्याची स्पर्धा नाही. प्रत्यक्षात घेतलेल्या वेळेपेक्षा फिनिश जास्त महत्वाची आहे. जर आपण चूक केली तर घाबरून जाऊ नका. आपली कैची घ्या आणि कापडाच्या तुकड्यांना वेगळे करण्यासाठी स्टिचेस उस्तरून टाका आणि पुन्हा सुरुवात करा.

आम्हाला आपली मोबाइल पाउच पाहण्याची इच्छा आहे.

जेव्हा आपण आपली मोबाइल पाउच शिवून पूर्ण कराल, तेव्हा कृपया आमच्या सोशल नेटवर्क पृष्ठांवर तिचे फोटो शेअर करा. शक्य असल्यास आपण काय वेगळे केले, आपण निवडलेली सामग्री, रंग इत्यादीविषयी स्पष्टीकरण द्या.

जर आपणास वाटते की हा प्रकल्प मजेदार आहे, तर आमच्याकडे जरी जास्त नाही तरी इतकेच मनोरंजक प्रकल्प आहेत.

या सर्व प्रकल्पांचे स्वतःचे वैयक्तिक व्हिडिओ आहेत जेथे पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक चरणास साध्या परंतु माहितीपूर्ण पद्धतीने स्पष्ट केलेले आहे. जर आपणास एखादा विशिष्ट भाग समजत नसेल, तर आपण प्रकल्प व्हिडिओच्या आधीच्या पाठांचा संदर्भ घेऊ शकता. हे पाठ आपल्याला वैयक्तिक चरण शिकवितात जसे की – कापड कसे कापावे, हेमिंग, झिपरची शिलाई इत्यादी.

यापैकी प्रत्येक पाठ आणि प्रकल्प ९ वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हणून आपणास जो सर्वात सोयीस्कर आहे त्याची निवड करा.

आम्ही आमच्या साइटवर आधीपासून असलेल्या दीर्घ सूचीमध्ये नियमितपणे प्रकल्प आणि व्हिडिओ जोडतो म्हणून त्यांना तपासत रहा. आपणास उषा सिलाई मशीनविषयी माहिती हवी असेल, तर आपण तिथे दाखविलेली संपूर्ण रेंज देखील शोधू शकता. आमचा ग्राहक सेवा क्रमांक देखील, साइटच्या उजव्या बाजूस दिलेला आहे म्हणून आपल्याला डेमो पाहिजे असल्यास किंवा इतर कोणत्याही माहितीची आवश्यकता असल्यास त्यांना कॉल करा.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment