Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे. मानसिक विकास आणि वर्तनाच्या दृष्टीने याचे बरेच फायदे आहेत. आपल्या मुलाला किंवा मुलीला शिलाईकामाची ओळख करून देण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. बाहेर जाऊन खेळता येऊ शकत नाही कारण खूपच गरम होत आहे. घरात काहीही न करता बसून राहणे कंटाळवाणे होऊ शकते आणि मुले सुस्त व आळशी बनू शकतात. म्हणून त्यांना शिलाई मशीन चालविणे शिकू द्या आणि त्यांच्यामध्ये या कौशल्यासाठी आवड कशा प्रकारे विकसित होती ते पहा. आणि त्याच वेळी आणखी बरेच काही मिळवा.

उत्तम ध्यान आणि संगठनात्मक कौशल्ये.

आज, जग वेगाने पुढे जात आहे. सर्वकाही बाइटच्या आकारात येते. यामुळे विशेषतः मुलांमध्ये, लक्ष देण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे. शिलाईकाम हा असा एक उपक्रम आहे, जो मुलांना त्यांची एकाग्रता विकसित करण्यात मदत करतो. मुला आणि मुली दोघांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आणि केवळ लक्ष देण्याची क्षमताच विकसित होत नाही, तर शिलाईकामामुळे व्यक्तीच्या संस्थात्मक कौशल्यांत वाढ होते.

शिवणकामासाठी आपल्याला एका ठिकाणी बसण्याची आवश्यकता असते, त्यामुळे आपल्या प्रत्येक चरणास समजून घ्या आणि योजना आखा. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी काहीतरी नवीन डिझाइन करत असेल, तर ते त्यांना समस्येचा आगाऊ अंदाज करण्यात मदत होते आणि ते समस्या उद्भवण्याआधीच उपाय शोधतात. परिणामी त्यांना व्यवस्थितपणे आणि पद्धतशीरपणे काम करण्याची सवय होते. या क्षमता आजच्या जगामध्ये खरे पाहता एखाद्या महाशक्तीसारख्या आहेत. ते त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये, मग तो अभ्यास असो किंवा जीवनात नंतर काम असो, त्यांना मदत करतील.

अधिक माहितीसाठी या लिंक्सवर क्लिक करा

http://fourseasonsmontessori.com/2017/11/03/sewing-builds-creativity-focus-and-concentration-in-young-children/
https://indianexpress.com/article/parenting/learning/sui-dhaaga-how-learning-to-sew-can-make-kids-smarter-5376840/

क्रीएटिव्हीटी वाढवते आणि कल्पनाशक्तीला उत्तेजन देते

आता शिलाईकाम एक कला बनली आहे. आपल्या पॅलेटमध्ये कापड, धागे, बटणे, विविध पोत आणि रंग, आरसे, मणी यांचा समावेश आहे … सूची अंतहीन आहे. आश्चर्यकारक गोष्टी तयार करण्यासाठी मुले आणि  मुली दोघांना या सर्वांना अजमावणे आवडेल. त्यांना त्यांना काय डिझाइन करायचे आहे त्यासाठी त्यासाठी त्यांच्या निर्मितीक्षमतेचा वापर करावा लागेल. येथेच आपण त्यांच्या कल्पनेस मुक्तपणे वावर करू देतो. एकतर त्यांच्या डोक्यात किंवा पेपरवर डिजाइन (आम्ही शिफारस करतो की त्यांनी हे करावे) एकदा डिझाइन तयार झाले की त्यानंतर खरा मजेचा भाग सुरु होतो. मत गोष्टी जुळविण्यास आणि त्यांना आकार देण्यास प्रारंभ करू शकतात. असे केले जात असताना, त्यांना पुन्हा गोष्टींना तपासण्यासाठी आणि डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित करा. कल्पना अशी आहे की त्यांना त्यांची निर्मितीक्षमता एक आश्चर्यकारक माध्यमाच्या द्वारे व्यक्त करू द्यावी.

फॅशन डिझाइनिंग इन्स्टिट्यूट्सला असे लोक आवडतात ज्यांना शिवणकाम आवडते.

आज, फॅशन, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी ही एक करिअरची एक उत्तम संधी आहे. जिथे आपण फॅशन डिझायनिंगचा अभ्यास करू शकू अशा जगभरातील संस्थांना मोठी मागणी आहे आणि त्यापैकी एखादीमध्ये प्रवेश मिळविणे अवघड आहे. आपल्या मुलाला किंवा मुलीला व्यवसाय म्हणून फॅशन डिझाइनिंगमध्ये स्वारस्य असेल, त्यांनी आताच शिलाईकाम शिकण्यास प्रारंभ करावा ही एक चांगली गोष्ट आहे.  याचे कारण असे आहे की फॅशन डिझाइन संस्था, रेझ्युमेवर शिवणकामाची क्षमता शोधतात. जेव्हा त्यांनी डिझाइनिंग क्षमता विकसित केल्या पाहिजेत, तेव्हा शिलाई कशी करावी यात वेळ घालविण्याची त्यांची इच्छा नसते.

म्हणून मग आपल्या मुलास इतर सर्व अर्जदारांच्या तुलनेत स्पर्धात्मक धार मिळवून द्या. त्याला किंवा तिला शक्य तितक्या लवकर शिलाई कशी करायची ते शिकू द्या.

शिवणकाम हे कपड्यांपेक्षा बरेच काही जास्त असते.

आता याच ठिकाणी बरेच लोक चूक करतात. जेव्हा ते शिवणकामाविषयी विचार करतात, तेव्हा ते फॅशन लाईनबद्दल विचार करतात. हे जरी खरे असले तरी, शिवणकामाच्या इतर काही बाजू आहेत ज्या खूप मनोरंजक आहेत.

चला आपण आंतरिक डिझाइनिंगमध्ये आहात असे समजू या. येथे तीच कापडे आणि सामग्री वापरली जातात परंतु वेगळ्या प्रकारे. आपणास कापड कसे कापावे, विविध टेक्सचर्सला अजमावणे आणि अगदी फिट बसणाऱ्या पद्धतीने शिलाई करणे या बाबी आपणास माहित असणे आवश्यक आहेत. शिलाईची मूळ मूलभूत तत्वे तीच आहेत, बदल झाला आहे तो केवळ ऍप्लिकेशनमध्ये.

असे इतर अनेक व्यवसाय आहेत ज्यांच्यामध्ये शिवणकामाची माहिती असणे आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त असते.

सर्वात मनोरंजक मार्गाने शिका आणि तयार करा.

www.ushasew.com येथे आम्ही आपल्याला सर्वात मजेदार आणि मनोरंजक मार्गाने कशी शिलाई करावी ते शिकवितो. आमच्याकडे असे व्हिडिओ आहेत, जे माहितीपूर्ण आणि अनुसरण करण्यास सोपी आहेत. असे प्रकल्प जे आपल्या नवीन कौशल्यांना चालना देतात आणि फायदेशीर ठरतात.

शिकण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी आपणास मूलभूत गोष्टींसह प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. एकदा आपण त्यांच्यामध्ये निपुण झाल्यानंतर आपण आपल्या नवीन कौशल्याचा वापर करू शकता आणि  आश्चर्यकारक गोष्टी तयार करू शकतात. जिथे आपण गोष्टी तयार करण्यास सुरुवात करतात त्या व्हिडिओजला प्रकल्प म्हणतात. आणि आपणास उत्साही आणि मग्न ठेवण्यासाठी आमच्याकडे असे बरेच व्हिडिओज आहेत.

आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेची कल्पना देण्यासाठी येथे सुरवात करा::

सुरुवातीसच आपण शिलाई मशीनचे कसे सेट अप करावे ते जाणून घेतो.

मग आपण पेपरवर शिवणकाम करून आपल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी पुढे शिकतो. होय पेपर! नियंत्रण आणि परिशुद्धता विकसित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

एकदा आपण याचा अभ्यास केला की आपण पुढे शिकतो आणि कापडावर कसे शिवावे ते शिकतो.

आपल्याला हे मूलभूत चरण समजल्यानंतरच, आपण एखाद्या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात करतो. आणि पहिले चरण खूपच मनोरंजक आहे.

आपण प्रथम जो प्रकल्प करतो तो आहे बुकमार्क. बुकमार्क इट हे बनविण्यास साधे, सोपे आणि त्यास एका तासापेक्षा अधिक वेळ लागत नाही. आपल्यासाठी हा प्रकल्प खरोखरच फायदेशीर ठरेल. आणि यामुळे आपणामध्ये पुढील पाठाकडे जाण्यासाठी उत्साह निर्माण होईल.

हे सर्व पाठ आणि व्हिडिओ ९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. म्हणून आपण प्रारंभ करण्यापूर्वी, आपल्याला सर्वात सोयीस्कर असलेली एखादी भाषा निवडा.

उषाकडे आपल्यासाठी मशीन आहे.

उषा येथे आम्ही शिलाई मशीन्सची एक रेंज निर्माण केली आहे, जिच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या वापरकर्त्याचा समावेश आहे. परिपूर्ण नवशिक्यापासून सर्वात अनुभवी व्यावसायिकांपर्यंत आमच्याकडे आपल्यासाठी मशीन आहे. आमच्या रेंजची तपासणी करा आणि आपल्या गरजा सर्वोत्तम प्रकारे भागविण्यासाठी एखाद्या मशीनची निवड करा. आपल्याला आमच्या ग्राहक सेवा लोकांशी बोलण्याची आवश्यकता असल्यास, आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती ते आपल्याला पुरवतील. आमच्या वेबसाइट www.ushasew.com वरून आमच्या रेंजला भेट द्या, आपल्याला काय आवडते ते पहा आणि नंतर आमच्या वेबसाइटवर स्टोअर लोकेटरचा वापर करून आपल्या जवळच्या उषा स्टोअरचा शोध घ्या.

एकदा आपण शिलाईकाम सुरू केल्यानंतर, आपण जे काही तयार करता ते पाहण्यास आम्हाला आवडेल.

एकदा आपण शिवणकाम सुरू केल्यानंतर, आम्हाला आपली निर्मिती पाहण्यास आवडेल. कृपया आमच्या कोणत्याही सोशल नेटवर्क पृष्ठांवर त्यांना आमच्याशी सामायिक करा. – (फेसबुक), (इन्स्टाग्राम), (ट्विटर), (यूट्यूब). आपण ते का तयार केले, ते कोणासाठी होते आणि आपण ते कसे तयार केले ते आम्हाला सांगा.

आता पुढे दीर्घ उन्हाळा असणार आहे म्हणून आमची अशी सूचना आहे की आपल्या थंड घरात बसावे आणि लगेच आपले पाठ शिकण्यास सुरुवात करावी.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing Personalized Gifts & Saving Pocket Money

Today kids have a more interesting and active social life...

Leave your comment