Your old denims will love this project

आपणा सर्वांकडे एक जुनी जीन्स आहे जी आपल्याला आवडते आणि कदाचित आपण तिच्यामध्ये राहतो. ती पूर्णपणे फिकी झाली आहे आणि ती इतकी आरामदायी बनली आहे की ती आपल्या जीवनाचा एक भाग बनली आहे असे वाटते. जर ती किनाऱ्याभोवती थोडीफार खडबडीत झाली असेल आणि तिला टाकून देण्याच्या विचाराने आपले हृदय कळवळून येत असेल, तर मग येथे एक चांगली बातमी आहे. आमच्याकडे एक प्रकल्प आहे जो तिला नवीन जीवन देईल आणि तिला डिझायनर क्षेत्रात घेऊन जाईल.

पुनर्जन्म! हो, हे जवळजवळ तसेच आहे.

आमचा असा सल्ला आहे की या आपण या जुन्या जीन्सपासून काहीतरी अद्वितीय गोष्ट बनवावी. ती एक अनोखी वस्तू होईल आणि ती निश्चितच लोकांचे लक्ष वेधून घेईल.

आता हे सोपे आहे. आपल्याला फक्त आपली कल्पना आणि क्रीएटीव्हीटी वापरण्याची आवश्यकता आहे. बस इतकेच! आपणास तिचे काय करायचे आहे त्याचे नियोजन करून सुरुवात करा. आपणास त्यांचे शॉर्ट्स बनवायचे आहे का? आपणास तिला लेस किंवा पॅचसह सजवायचे आहे का? काहीही आणि सर्वकाही शक्य आहे.

आपण अशा प्रकारे सुरुवात करू शकता

प्रथम उषासो डॉट कॉमवर जा आणि तिथे दिलेल्या पाठांचा अभ्यास करा. ते छोटे आणि अनुसरण करण्यास सोपे आहेत. ते आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती देतील आणि सर्वोत्तम पद्धतीने कसे शिवावे ते शिकवतील. पहिले काही पाठ आपणास मूलभूत गोष्टी दाखवतील आणि नंतर तेथून पुढे आपण योग्य प्रकारे शिलाई करू शकाल.

या पाठांचा योग्य क्रमाने अभ्यास करा. प्रत्येक पाठ पुढच्या पाठाचे मार्गदर्शन करतो म्हणून व्हिडिओवर जंप करू नका कारण आपण महत्त्वपूर्ण टिप्स गमावू शकता. प्रत्येक पाठानंतर आपण प्रवीण होईपर्यंत सराव करावा.

आपण मुलभूत गोष्टी शिकल्यानंतर की, प्रकल्प नं ६ कडे जावे. या प्रकल्पात आपणास शॉर्ट्सची सजावट करायची ते दाखविले आहे.

उत्तम प्रभावासाठी सोपी चरणे

एकदा आपण प्रकल्पाचा व्हिडिओ पाहिला की आपल्या लक्षात येईल की त्यात शॉर्ट्सची सजावट करण्यासाठी वेगळ्यावेगळ्या पद्धती दाखविल्या आहेत. प्रकल्पामध्ये लेसचा वापर केला गेला आहे परंतु आपण आपल्या क्रीएटीव्हीटीला पुढाकार घेऊन देऊन आपल्या कल्पना इच्छेनुसार काहीही जोडू शकता. शिवणकामाची मूलभूत तत्वे समान असल्यामुळे, आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सामग्रीला बदलाने सोपे जाईल.

आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे हे समजणे आवश्यक आहे आणि व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे.

हा प्रकल्पामध्ये इतर कापडांवर देखील काम केले जाऊ शकते.

एकदा आपण आपल्या जुन्या डेनिममध्ये नवीन जीवनदान दिले की आपण इतर कापडांचा विचार करू शकता. त्यांना जुने असणे आवश्यक नाही, परंतु ते फक्त असे असावेत ज्यांना आपणास थोडेस शैलदार बनवायचे आहे. समान तंत्रांचा वापर करा, सूचना समजून घ्या आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे लागू करा. आपण खरोखर आपल्या क्रीएटीव्हीटीला प्रवाहित होऊ देऊ शकता. झिपर वापरा, टॅसल्स आणि बीड्स जोडा, बाह्यांना पुन्हा आकार द्या … काहीही शक्य आहे. आपण ज्या पाठांचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये हे सर्व चरण दाखविले गेले आहेत. आता आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने लागू करायचे आहे.

म्हणून त्या डेनिमला वाट पाहून देऊ नका आणि शिवणकाम सुरु करा.

आपण जे काही तयार करता, ते पाहण्यास आम्हाला आवडेल. कृपया जेव्हा आपण त्यांना पूर्ण कराल तेव्हा त्यांना आमच्या सोशल नेटवर्क पेजवर शेअर करा. शक्य असल्यास आम्हाला आपल्या विचारसरणीमध्ये आणि चरणांमध्ये समाविष्ट करून घ्या, जेणेकरुन इतर लोक आपल्याकडून शिकू शकतील.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment