Usha and the Mumbai Indians want you to win!

मोठी स्पर्धा आता सुरू झाली आहे. संघ मैदानात उतरले आहेत. आणि आतापर्यंत खेळ अटीतटीचे झाले आहेत. आता आपण सुरुवात करू शकता आणि विजेता बनू शकता.

उषा आपणास संघाचा एक भाग म्हणून निमंत्रित करत आहे आणि त्यांच्याबरोबर खेळा. आता आम्ही क्रिकेटबद्दल बोलत नाही म्हणून प्रत्येकाचे स्वागत आहे. आपण आपले वय आणि आपण पुरुष आहात किंवा महिला आहात या बाबी विचारात न घेता खेळू शकता. तसेच फिजिकल फिटनेस टेस्ट देखील नाही म्हणून बिनधास्त रहा. आपणास जिथे आरामदायक वाटत असेल तिथे – घरात, कामावर किंवा शाळेत जात असताना, ऑफिसमध्ये, खरे पाहता कुठेही खेळावे अशी आमची इच्छा आहे. आपल्याला कडे फक्त जिंकण्याची इच्छा असली पाहिजे.

आपण उषा जोनोम वंडर स्टिच प्लस जिंकाल

आता हे असे शिलाई  मशीन आहे जे प्रत्येकाला हवे आहे. उषा जनोम वंडर स्टिच प्लसमध्ये, स्वयंचलित नीडल थ्रेडिंग, २३ बिल्ट-इन स्टिचेस, पॅटर्न निवडीसाठी, स्टिचच्या लांबीच्या निवडीसाठी आणि स्टिचच्या रूंदीच्या निवडीसाठी तीन डायल्स, तसेच अतिरिक्त संरक्षणासाठी हार्ड कव्हर आहे. त्यात १२ ऍप्लिकेशन्स आणि ब्लाइंड हेमिंगसाठी विशेष फूट आहेत आणि मशीनबरोबर फाइन एज स्टिचिंग पुरविण्यात आलेले आहेत. स्वयंचलित बटन होल्स करण्यासाठी एक प्रेसर फूट एक अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. जर आपण या मशीनच्या किंमतीबद्दल विचार करीत असाल, तर उषा जनोम वंडर स्टिच प्लसची किंमत रु. १८,००० / – इतकी आहे.

या मशीनचे सर्वोत्कृष वैशिष्ट्य हे आहे की हे वापरण्यास सोपे आहे. कोणीही, अगदी लहान मुल देखील, अगदी थोड्या कालावधीत कसे चालवायचे ते शिकू शकते. आपल्याला शिवणकामाची उत्कृष्ट कला शिकवण्यासाठी व्हिडिओच्या स्वरूपात आमच्याकडे परिपूर्ण शिक्षण प्रोग्राम देखील आहे.

जर आपणास शिकायचे असेल तर, उषासो डॉट कॉमवर जा आणि आजच आपले पाठ सुरू करा.  सर्व पाठ अनुसरण करण्यास सोप्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओच्या स्वरुपात आहेत. या पाठांच्या अधूनमधून असे प्रकल्प जोडण्यात आलेले आहेत, जे आपण शिकलेली कौशल्ये वापरण्यात मदत करतात. आणि आपली कल्पना आणि क्रीएटीव्हीटी दाखविण्याची संधी आपल्याला देतात.

आता खेळाकडे परत जाऊ या!

आम्ही आशा करतो की आपण उत्साहित आणि मैदानावर जाण्यास सज्ज झाले असाल. खरे तर आपण मुंबई इंडियन्सचा सामना पाहावा, उषा मुंबई इंडियन्स व्हिडीओ पहावा  आणि नंतर खेळायला जावे.

प्रत्येक मुंबई इंडियन्सच्या सामन्यात खेळ.

प्रत्येक वेळी मुंबई इंडियन्स मैदानात उतरते तेव्हा ही स्पर्धा सुरु होते.  प्रत्येक सामन्याच्या वेळी, जेव्हा आम्ही उषा मुंबई इंडियन्स व्हिडीओला स्क्रीन करू, तेव्हा तो आपण पहावा आणि नंतर तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

नोंदणी करा, तीन प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका!

वेबसाइट www.ushasew.com/ushamicontest ला भेट द्या आणि स्वत: ची नोंदणी करा. मग तीन स्पर्धा प्रश्नांची उत्तरे द्या. बस एवढेच! आता आपणाकडे उषा जनोम वंडर स्टिच प्लस जिंकण्याची संधी चालून आली आहे!

पुन्हा व्हिडिओ पहा आणि आपली आठवण पुन्हा ताजी करा.

आमची आपण जिंकावे अशी इच्छा आहे आम्ही ते आणखी सुलभ केले आहे. प्रश्न सोपे आहेत आणि आपल्याला व्हिडिओमध्ये सर्व उत्तरे सापडतील. म्हणून आपल्याला कोणत्याही शंका असल्यास, आपण पुन्हा त्यांना ऑनलाइन पाहू शकता. आम्ही त्यांना प्रश्नांच्या पुढेच  ठेवले आहे.

आपण जिंकत नाही तोपर्यंत खेळत रहा!

ही स्पर्धा, संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान चालू आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे टॉपवर येण्यासाठी एकाधिक संधी आहेत. आपल्याला केवळ सामन्याच्या दिवशी साइटवर परत यावे लागेल आणि पुन्हा सहभागी व्हावे लागेल. म्हणून आपण जिंकत नाही तोपर्यंत खेळत रहा.

प्रत्येक सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विजेत्यांची घोषणा केली जाईल.

सर्व विजेते शक्य तितक्या लवकर ठरविले जातील. आम्ही सर्व नोंदी पाहू आणि सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक विजेत्याचे नाव घोषित करू.

सर्व विजेत्यांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल. विजेत्यांची नावे फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर देखील घोषित केली जातील. तर आपण तेथेही तपासू शकता.

आता खेळण्यास सुरुवात करा आणि विजयी व्हा!

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment